पंचांग राशिफल भक्ति का मार्ग त्योहार
भजन

मराठी लोकगीत : चांदण चांदण झाली रात लिरिक्स

1 मिनट पढ़ें
चांदण चांदण झाली रात, 
एकविरीची पाहत होते वाट .....

पुण्याचा सोनार बोलवा ग 
आईला नथनि घडावा ग .....
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट 
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, 
एकविरीची पाहत होते वाट .....

ठाण्याचा कासार बोलवा ग 
आईला बांगड्या भरा ग .....
लिंब ग नारळाच घेऊन ताट, 
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, 
एकविरीची पाहत होते वाट .....

रायगड चा लोहार बोलवा ग, 
आईला त्रिशूल घडावा ग .....
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, 
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात, 
एकविरीची पाहत होते वाट ....